शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंच महाराष्ट्र आयोजित अदिवासी विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
शिंदखेडा (यादवराव सावंत) भिल समाज विकास मंच महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक दिपक दादा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात ५२ गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करुन शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. यात आदिवासी विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून शैक्षणिक जनजागृती करण्यात आली.
दरवर्षी भिल समाज विकास मंच महाराष्ट्र. गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सत्कार समारंभ आयोजित करतात . यावर्षी भिल समाज विकास मंच ने शैक्षणिक जनजागृती मोहीम सुरू केली आहे ही मोहीम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे.तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकारी ची उपस्थिती लाभली त्यात नगरसेवक चंद्रकांत सोनवणे , जिल्हा सचिव अशोक सोनवणे, अशोक मालचे, बापुजी फुले, बापू ठाकरे, बापू मालचे, शामा ठाकरे, शाम मालचे, भाऊसाहेब मालचे, गुलाब मोरे, संजय भिल आदी पदाधिकारी सह समाजातील महिला व बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.