जामठी येथील महाजन विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
बोदवड (सतिष बावस्कर) सन 2022 वाषीक परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक नाशिक विभाग यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षा निकाल लागला असून या परीक्षा मध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जामठी येथील चि.स. महाजन विद्यालयातील निकाल 97% लागल्याने यामध्ये विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला.
दहावी मध्ये येणारे गुणवंत विद्यार्थी निकाल (88%)
1) मराठे हर्षल गणेश ९२%
२) सत्रे दुर्गेश राजेंद्र। ९१%
३) कुमारी डोंगरे तनुजा मनोज ८९%
बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी (निकाल 97%)
१ )कु. ठोंबरे अरुणा प्रल्हाद ८६%
२) कुमारी माझं प्रतीक्षा रवींद्र ८५%
३) कुमारी पाटील आरती भागवत ८४.६७%
सर्व यशस्वी यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने परिसराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
शाळेचा विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन करून उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अशोक भाऊ सत्रे, उपाध्यक्ष अंबादास भाऊ चौधरी, सचिव भगवान भाऊ महाजन तसेच ज्येष्ठ सदस्य संभाजीराव पाटील व परिसरातील डॉक्टर आनंद माळी
गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते आणि शाळेच्या वतीने त्यांचा ही सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक के. आर. पाटील, पर्यवेक्षक एस. टी. कोळी, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि असंख्य विद्यार्थी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.