बोदवड नगरपंचायत कार्यालयांतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के निधी वाटप
बोदवड (सतीश बावस्कर) बोदवड नगरपंचायत कार्यालयांतर्गत दिव्यांग बांधव यांना दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा पाच टक्के निधी दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात आला. नगरपंचायत स्व, उत्पन्नातून सदर हा पाच टक्के निधी दिव्यांग बांधवाना दरवर्षी देण्यात येत असते, बोदवड शहरामध्ये एकूण लाभार्थी 160 ते 165 पर्यंत लाभार्थ्यांना साडेतीन हजार रुपये प्रमाणे लाभार्थी यांना देण्यात आले.
यासाठी बोदवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन उगले हे सहा ते सात वर्षापासून नेहमीच दिव्यांग बांधवांसाठी धावपळ करीत असतात. सदर ते दिव्यांग बांधवांना पाच टक्के, निधी मिळावा म्हणून मोफत फॉर्म दिव्यांग बांधवांना देऊन त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून दिव्यांग लाभार्थी नगरपंचायतीकडे देत असतात, तसेच नगरपंचायती मधून पाच टक्के निधी दिव्यांग लाभार्थी यांना देण्यात आला. निधी वाटप करतेवेळी उपस्थित असलेले नगराध्यक्ष आनंदा पाटील, उपनगराध्यक्ष रेखाताई गायकवाड, मुख्याधिकारी डोईफोडे, लिपिक वराडे तसेच नगरसेवक, व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी धनराज गायकवाड, सचिन उगले, प्रविण वंजारी, श्याम लुड, डुंगरवाल काकाची भगवान सूर्यवंशी, अनिल भोई, रेंगे व दिव्यांग बांधव उपस्थित होते. तसेच आता पंचायत समिती कार्यालयमध्ये संबंधित असलेले गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून बोदवड तालुक्यातील ग्रामीण ग्रामपंचायत येथून दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटप करण्यात यावा, याबाबत गटविकास अधिकारी बोदवड यांच्याशी संपर्क करण्यात येणार आहे, व दिव्यांग बांधवांनी यांनी पाच टक्के निधी मिळावा म्हणून ग्रामपंचायतीकडे मागणी करून संपर्क करावा जेणेकरून पात्र असलेले दिव्यांग लाभार्थी वंचित राहणार नाही.