शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या गजानन गोटे यांची मुंबई येथे उप पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती शहरातुन सत्कार सोहळा
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PSI गजानन गोटे यांची API पदी पदोन्नती मुंबई येथे झाल्याने त्यांचा आज शिदंखेडा येथे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी पोलीस स्टेशनचे प्रशांत गोरावडे, सुनील केदार नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक सुमित जैन, मनिष जैन, भडणे सरपंच गिरीश देसले. हाजी शब्बीर पठाण. राकेश पवार, गुलाब सोनवणे, तालुका पत्रकार यादवराव सावंत यासह पोलीस बांधव व शहरातील प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित राहुन त्यांना शुभेच्छा व सत्कार करण्यात आला.शिंदखेडा शहरातील पोलीस स्टेशन ला पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे एक अभ्यासू , तरुण नेतृत्व तसेच कर्तव्य दक्ष सेवा केली आहे. प्रामाणिकतेचा ठसा आपल्या सेवेतून त्यांनी दिलेला होता. त्यांची उणीव कायमस्वरुपी भासणार आहे असे नगरपंचायत विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. याशिवाय अनेक शहरातील मान्यवरानी विचार प्रकट केले.



