Horoscope : राशिभविष्य, सोमवार २७ जून २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. काहींना कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नातेवाइकांचा सहवास लाभेल.
सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
तूळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनू : सहकार्याची अपेक्षा नको. नोकरीत चांगली स्थिती राहील.
मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. संततिसौख्य लाभेल.
मीन : भाग्यकारक घटना घडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.



