बोदवड बसस्थानकावरील शौचालय बंद उघडयावर करावे लागते शौचालय शाळेतील विद्यार्थी चे हाल.
दिनांक-१६ जुलै २०२२
प्रतिनिधि: सतिष बावस्कर
बोदवड- शहराललागून आजुबाजूच्या गावातील सुमारे दोन हजार विदयार्थी विद्यार्थीनी शाळेत येतात बोदवड शहराला लागून आजुबाजूच्या पन्नास गावातील विदयार्थी येथे शाळेत येतात तसे जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बस स्थानकावर सर्व सोयी आहेत परंतु बोदवड बसस्थानकावर का नाही असा प्रश्न? सर्वसामान्य नागरिकांना पडतो राष्ट्रपती पद,सहकार महर्षी पद, परिवहन मत्री पद, बारा खात्याचे मंत्री पद, जिल्हा परिषद अध्यक्ष पद, या तालुक्याने दिले असताना सुद्धा या तालुक्यात शेतकऱ्याचे शाळेत येणाऱ्या मुला-मुली साठी बसस्थानकावर शौचालयाची व्यवस्था नाही.
हि या तालुक्याच्या ची मोठी शौकांतिका आहे.तालुक्यातील विकासकामांना कोट्यावधी निधी मिळत असताना बसस्थानकावर असलेल्या शौचालय दुरुस्ती साठी का मिळत नाही का आमदार खासदार याना बोदवड बस स्थानक माहिती नाही का?



