शिवसेनेचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या निषेधार्थ वैजापूर येथे आंदोलन
औरंगाबाद (गहिनीनाथ वाघ) वैजापूर तालुक्यातील शिवसेना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या बंडखोरी नंतर जाहीर निषेधार्थ आमदार रमेश बोरणारे यांच्या फोटोला काळे फासून निषेध व्यक्त केला.
वैजापूर तालुक्यातील आमदार हा गद्दार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच ॲडव्होकेट असाराम रोटे हे मत व्यक्त करताना बोलले की आमदार बोरणारे बोलतात की मी तालुक्याला साडेतीनशे कोटी रुपये आणले हे पैसे, आमदाराच्या बापाचे नसून ते उद्धव ठाकरे सरकारनी दिले आहेत हे आमदार भगोडा आहेत तसेच आमदार बोरनारे यांच्या भावजई जयश्री बोरनारे यांनी जाहीर निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला, भाऊजईस भर रस्त्यामध्ये मारहाण केली तो काय जनतेची सेवा करेन असेही जयश्री बोरणारे यावेळी बोलल्यात, यावेळी बॅनर वरती असलेला आमदार रमेश बोरणारे यांच्या फोटो ला संजय पाटील निकम , आसाराम रोठे यांनी चप्पलने तोंडात मारल्यात व जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करत.शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्यात.