वाल्या सेना गृपला एक वर्ष पूर्ण ; मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य केले वाटप
मालपूर : आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळी समाजातील युवा शक्तीची दमदार संघटन वाल्या सेना गृपला एक वर्ष पूर्ण झाले.
एका वर्षात समाजातील युवा शक्ती च्या मार्फत अन्यायाविरुद्ध आवाज उठवून गोरगरिबांना मदत अशी अनेक कामे सुरू आहेत. आज आनंद खेडे येथे वाल्या सेना गृप च्या प्रथम वर्धापनदिन निमित्त आदिवासी टोकरे कोळी कुटूंबातील कै कैलास भाऊ नवसारे या अपंग समाज बांधवाचाचा मागील वर्षी कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीला मुलींना शिक्षण देण्यासाठी मदत म्हणून त्यांच्या तीन छोट्या मुलींच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आज देण्यात आले.
यावेळी वाल्या सेना गृप च्या मार्गदर्शक गीतांजली कोळी, कार्याध्यक्ष संदिप तवंँर, धुळे तालुकाध्यक्ष हेमराज कोळी धुळे कार्याध्यक्ष विजय चित्ते, वाल्या सेना चे रंजीतभाऊ कोळी, निलेश कोळी, आसाम आर्मीतील कोळी भाऊ यांच्या सह अनेक वाल्या सैनिक उपस्थित होते.