ठाकरे सरकार कोसळलं ; अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा !
मुंबई : आपल्यासोबत तब्बल 45 आमदार असल्याचा दावा शिंदेनी केला आहे. त्यानंतर मात्र शिवसेनेचे दोन गट स्पष्टपणे दिसून येत होते. भाजपसोबत सत्ता स्थापन करायची की, पदावरुन पायउतार व्हायचं हे दोनचं पर्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे होता. शेवटी आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचा राजीनामा देखील मान्य केला आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मी आपल्याशी संवाद साधून आश्वास्त केलं होतं. असो हा फार पूर्वीचा किस्सा आहे. त्यानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथपर्यंत अतिशय चांगल्यापद्धतीने कार्यभार झाला. छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देवून सरकार म्हणून काम सुरु केलं. हा एक योगायोग होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आपण विसरणार नाहीत हे माहिती आहे.
आयुष्य सार्थकी झाली, अशी माझी भावना आहे. औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर नाव दिलं आहे. तर उस्मानाबादचं धारावीश नाव दिलं आहे. असे अनेक गोष्टी आपण करत आलो आहोत.
एखादी गोष्ट चांगली असली की त्याला दृष्ट लागते, असं म्हणतात. शरद पवार आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. आजच्या बैठकीत शिवसेनेचे फक्त चार मंत्री होते. औरंगाबादच्या नामकरणाचा ठरवा मांडला तेव्हा दोन्ही पक्षांनी विरोध केला नाही. त्यांचे विशेष आभार मानतो. ज्यांचा विरोध आहे असं भासवलं जात होतं ते सोबत राहिले.
शिवसेनेला 56 वर्षे झाली. लहानपणापासून शिवसेना काय आहे हे फक्त बघत नाही तर अनुभवत आलो. शिवसेनाप्रमुखांनी रिक्षा चालक ते वॉटमेन अनेकांना मंत्री केलं. माणसं मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं ती विसरायला लागले. जे जे देता येईल ते सर्व दिलं तरी ते लोकं नाराज. मी मातोश्रीला आल्यानंतर अनेक लोक येत आहेत ते लढा आम्ही सोबत आहोत, असं सांगत आहेत. ज्यांना नाही दिलं ते हिंमतीने सोबत आहेत. यालाच शिवसैनिक! याच नात्याच्या जोरावर शिवसेना उभी राहिली. शिवसेनेने अनेक आव्हानं झेलली. न्यायदेवतीचा निकाल मानली पाहिजे. राज्यपालांनी फ्लोर टेस्ट करण्याचा आदेश पालन करण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. राज्यपालांचे आभार. त्यांनी 24 तासाच्या आत आम्हाला फ्लोर टेस्टचे आदेश दिले. 12 सदस्यांची यादी लटकून राहिली आहे ते घोषित करावी, ही विनंती.
जे दगा देणार ते असे सांगत होते ते सोबत आहेत. अशोक चव्हाण म्हणाले की आपल्या लोकांना सांगा आम्ही बाहेर पडतो. बाहेरुन पाठिंबा देतो. तुमची नाराजी आहे तरी कोणावर? मी काय करु? आपली नाराजी सुरत किंवा गुवाहाटीला जावून बोलण्यापेक्षा आताच सांगा. तुमच्या भावनांचा मी आदर करतोय. पण समोर येवून बोला. मला या भानगडीत बोलायचं नाही. शिवसैनिकांनी तुम्हाला आपलं मानलं होतं.



