एकनाथराव जाधव यांची रावसाहेब दानवे यांच्यासोबत चर्चा
वैजापूर (गहिनीनाथ वाघ) तालुक्याचे भाजपा औरंगाबाद प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव यांनी सदैव वैजापूर तालुक्याच्या विकास कामासाठी प्रयत्न केले. गोरगरिबांसाठी स्वखर्चातून श्रमदान कार्डचे वाटप केले विधवा महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला व औरंगाबादकरांना जी काही गॅस पाईपलाईन मंजूर झालेली आहे त्याविषयी राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत चर्चा केली व माहिती विचारली रावसाहेब दानवे यांनी माहिती देत असताना सांगितले की आता औरंगाबादकरांना गॅस स्वस्तात मिळणार व गॅसची पाईपलाईन घरोघरी जाणार त्यामुळे गॅसचा खर्च फार कमी होणार व वाहतूक खर्चही कमी होणार अशी चर्चा करत असताना तेथे अर्थमंत्री भागवत कराड जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद विजय आवताडे व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव होते. चर्चा झाल्यानंतर सकाळी २ मार्च २०२२ रोजी गॅस पाईपलाईनचे उद्घाटन झाले औरंगाबाद येथे करण्यात आले.




