क्रेडिट कार्डच्या नावाने गंडवले
जळगाव (प्रतिनिधी) मी स्टेट बँकेतून बोलत असून तुम्हाला लागणारे वार्षिक शुल्क माफ करायचे असेल तर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा. ओटीपी सांगताच क्रेडिट कार्ड धारकाच्या खात्यातून ६३ हजार गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरातील रहिवासी तिवारी (वय ४५) खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत करतात. त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे दोन क्रेडिट कार्ड आहेत. हे कार्ड वापरणाऱ्यासाठी त्यांना वार्षिक शुल्क द्यावे लागत असल्याने त्यांनी २४ नोव्हेंबरला ग्राहक सेवा केंद्रात दूरध्वनी करून हे चार्जेस कमी करण्यात यावे यासाठी विनंती केली होती. परिणामी २७ नोव्हेंबरला दुपारी १.५२ च्या सुमारास तिवारी यांना एका नंबरवरुण महिलेचा कॉल आला. त्यांनी मे स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट से बात कर रही हू… आपको वार्षिक शुल्क माफ करणा है, तो मैने आपको ओटीपी भेजा है… वह ओटीपी मुझे बाताओ असे सांगितले. दरम्यान तिवारी यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्या महिलेला सांगितला. त्यानंतर काही वेळातच तिवारी यांच्या दोन्ही कार्ड मधुन सुमारे ६३ हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज आला.