महाराष्ट्र
साक्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
साक्री (प्रतिनिधी) तालुक्यातील एज्युकेशन सोसायटी व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी प्रतिमांचे पूजन करून विद्यालयाचे प्राचार्य पोपटराव ढोले बापू, उपप्राचार्य नरेंद्र तोरवणे आबा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवाजी देवरे सर यांनी दिनविशेष सांगितला. सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला.