चोपडा

चित्रकला ही जगाची आणि हृदयाची भाषा : प्रा. अरुणभाई गुजराथी

चोपडा (विश्वास वाडे) चित्रकला ही जगाची आणि हृदयाची भाषा आहे. माणसाच्या जन्मापासूनच चित्रकलेचा जन्म झाला आहे. परंतु सध्याच्या युगात तंत्रज्ञानामुळे कला मागे पडत असल्याची रुखरुख वाटते. चित्र हा व्यापक विषय असून चित्रामुळे करुणा जागते तसेच मानवता निर्माण होते. चित्रातून विचार, उर्मी आणि संवेदना निर्माण होतात. चित्राच्या माध्यमातून समाजाचे दर्शन होते, समाजाच्या संस्कृतीचे, संस्कारांचे व अभिरुचीचे दर्शन होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी केले.

भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्र, चोपडा (जि. जळगाव) व अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव, पु. ना. गाडगीळ अँड सन्स, जळगाव यांच्या सहकार्याने भगिनी मंडळ संस्थेच्या माजी अध्यक्षा तसेच अखिल भारतीय महिला परिषद नवी दिल्ली च्या माझी उपाध्यक्षा, माजी नगराध्यक्षा स्व. डॉ. सुशीलाबेन शाह यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त दि. ५ डिसेंबर रोजी संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘उपक्रमशील कलाशिक्षक राज्य पुरस्कार – २०२१’  वितरण सोहळ्यात प्रा. गुजराथी बोलत होते. त्यांच्या हस्ते राज्यातील २२ कलाशिक्षकांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.(रोख ₹.११०००/ची १०व₹५५००/-ची १२, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.) याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव सौ. उर्मिलाबेन गुजराथी यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य चित्रकला व शिल्प विभागाचे निरीक्षक प्रा. संदीप डोंगरे, अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे सरचिटणीस एस. डी. भिरुड, सेवानिवृत्त निरीक्षक प्रा. भास्कर तिखे, उपक्रमशील कलाशिक्षक राज्य पुरस्कार निवड समितीचे प्रमुख मोहन भोजापुरे (अकोला), सदस्य मल्लिकार्जुन सिंदगी (पुणे), सौ. हेमा धोत्रे (पुणे), महेशचंद्र राजगिरे (नागपूर), शशिकांत गुरव (इस्लामपूर), खानदेश कलाभूषण एल. झेड. कोल्हे (जळगाव), सेवानिवृत्त कलाशिक्षक आर. टी. पवार (लासुर), प्राचार्य अतुल मालखेडे, खिरोदा, चोपड्याच्या नगराध्यक्षा मनीषा चौधरी, माजी जि. प. सदस्य ॲड. घनश्याम पाटील, पं. स. सभापती सौ. कल्पना पाटील, उपसभापती सुर्यकांत खैरनार, दी चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी हे उपस्थित होते.

भगिनी मंडळ संस्थेच्या ललित कला केंद्रातर्फे प्रस्तावाशिवाय दिला जाणारा पुरस्कार ही कला शिक्षणासाठी आणि कला शिक्षकांसाठी प्रेरणादायी व अभिमानाची बाब आहे. कला विषयातून केवळ चित्रकला शिकणे हा हेतू नसून त्याद्वारे मुलांवर एकाग्रतेचा व बैठकीचा संस्कार होतो. राज्यात गेल्या काही काळापासून कला शिक्षकांची भरती होत नाही ही खेदाची बाब असल्याचे, शालिग्राम भिरुड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तर उपक्रमशील कलाशिक्षक मल्लिकार्जुन सिंदगी यांनी ललित कला केंद्रातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार राज्य पुरस्कारा इतकाच तोलामोलाचा असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा. संदीप डोंगरे (निरीक्षक, महाराष्ट्र राज्य चित्रकला व शिल्प, मुंबई) यांनीही मनोगत व्यक्त केले व उपक्रमाचे कौतुक केले.

या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रास्ताविकात ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी राज्यात कलाशिक्षणाची होणारी अवहेलना, कला शिक्षकांची बंद झालेली भरती व पुरस्कार सोहळ्यामागील भावना विशद केली. सूत्रसंचालन संजय बारी व निशा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उपक्रम प्रमुख प्रा. सुनील बारी यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. आशिष गुजराथी, प्रा. विनोद पाटील, प्रा. संजय नेवे, भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

प्रारंभी स्नेहल नागपुरे, वैष्णवी सोनार, निकिता सोनार, प्रथमेश बारी, पंकज नागपुरे, अनुराग नागपुरे यांनी ईशस्तवन सादर केले. मान्यवरांच्या हस्ते स्व. सुशीलाबेन शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तसेच देणगीदारांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान सचिन बारी यांनी बनवलेली स्व. सुशीलाबेन शाह यांच्या आठवणींना उजाळा देणारी चित्रफित दाखवण्यात आली. कथकली नर्तकाच्या वेशभूषेतील प्रणय मुंडले या विद्यार्थ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सोहळ्यास राज्यभरातील कलाशिक्षक व त्यांचे परिवारजन, उद्योजक वसंतलाल गुजराथी, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, सौ. कुमुदिनीबेन गुजराथी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर केंगे, कृ.उ. बा.चे माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, रोटे. एम. डब्ल्यू. पाटील, जिल्हा व तालुका कलाध्यापक संघाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक शिक्षक, विद्यार्थी व कलाप्रेमी उपस्थित होते.

उपक्रमशील कलाशिक्षक राज्य पुरस्कार – २०२१ चे मानकरी (₹ ११ हजार) :

ललित कला केंद्र, चोपडा पुरस्कृत डॉ. सुशीलाबेन शाह स्मृती उपक्रमशील कला शिक्षिका राज्य पुरस्कार – सौ कल्पना रसिक गुलालकरी (संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा, नागपूर), ललित ओंकार नेमाडे, जळगाव पुरस्कृत श्रीमती इंदुबाई ओंकार नेमाडे स्मृती पुरस्कार – सौ. सुरेखा गजाननराव मोगरे (विश्वनाथ सिंग बयास हिंदी हायस्कूल, पुसद), प्राचार्य गीता चौधरी, खिरोदा पुरस्कृत प्राचार्य मनोहर चौधरी स्मृती पुरस्कार – निलेश ओंकार चौधरी (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, जळगाव), प्रा. दिनेश पाटील, खिरोदा पुरस्कृत प्राचार्य सी.एन. पाटील स्मृती पुरस्कार – माधव एकनाथराव घयाळ (स्वा. सै. कै. रामराव कान्हेकर निवासी अस्थिव्यंग विद्यालय, परभणी), श्रीमती अंजली गवळी, अंबरनाथ पुरस्कृत गुलजार गवळी पुरस्कार – मोहम्मद इलाही बागवान (महाराष्ट्र संत विद्यालय, तेर, उस्मानाबाद), माजी विद्यार्थी सप्तपुट ललित कला भवन, खिरोदा पुरस्कृत प्रा. प्रकाश तांबटकर पुरस्कार – रणजीत दत्तात्रय वर्मा (जि. प. प्राथमिक शाळा सातघरी, जि नांदेड), श्याम कुमावत, नशिराबाद पुरस्कृत कुमावत स्मृती पुरस्कार – पंकज आनंदा नागपुरे (प्रताप विद्या मंदिर, चोपडा), श्रीमती नीता बेंडाळे, भुसावळ पुरस्कृत राजेंद्र बळीराम बेंडाळे पुरस्कार – श्रीराम साहेबराव महाजन (चेंबूर कर्नाटका हायस्कूल, चेंबूर), प्रल्हाद सोनार, शिरपूर पुरस्कृत आर. टी. पवार सन्मानार्थ पुरस्कार – राजेंद्र भगवान ठोके (म.गांधी विद्यामंदिर, विटे, सांगली) कलाशिक्षक राजेंद्र जावळे पुरस्कृत गुरुवंदना पुरस्कार – प्रल्हाद चिंधुजी ठक (आनंद मूकबधिर विद्यालय, आनंदवन, चंद्रपूर)

उपक्रमशील कलाशिक्षक प्रेरणा राज्य पुरस्कार – २०२१ चे मानकरी (₹ ५,५००/-) :

वसंत व पंकज नागपुरे, चोपडा पुरस्कृत कलाशिक्षक ए.बी. नागपुरे स्मृती पुरस्कार – विजयानंद आनंदा काळे (जि. प. प्रशाला, शिवना, औरंगाबाद), सुनील पाटील, गोरगावले पुरस्कृत पी. व्ही. पाटील स्मृती पुरस्कार – ज्ञानेश्वर कौतिक माळी (म. नी. दांडेकर हायस्कूल, पालघर), कीर्तिकुमार शेलकर, जळगाव पुरस्कृत डी. ओ. शेलकर स्मृती पुरस्कार – समीर अशोक चांदरकर (वराडकर हायस्कूल, कट्टा, सिंधुदुर्ग), शिवप्रसाद जोशी, जामनेर पुरस्कृत – पी. एस. जोशी स्मृती पुरस्कार – तुकाराम शिवाजी पाटील ( न्यू इंग्लिश स्कूल, चिंचघरी, रत्नागिरी), श्रीमती संगीता चौधरी, जळगाव पुरस्कृत सुहास चौधरी स्मृती पुरस्कार – अजय रामराव जिरापुरे (शेठ फ. ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वे, अमरावती)  सुनील पाटील, गोरगावले पुरस्कृत पुष्‍पाबाई पाटील स्मृती पुरस्कार – सौ वर्षा विक्रांत भिंगारे (एम. एस. इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल, निगडी), हारुण पटेल, मोहाडी पुरस्कृत रज्‍जाक पटेल स्मृती पुरस्कार – मारुती ज्ञानदेव कांबळे (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, शिरोळ, ठाणे), प्रा. शोभना कोळी, एरंडोल पुरस्कृत रविराज कोळी स्मृती पुरस्कार – ज्ञानेश्वर रामदास कवडे (न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर, अहमदनगर),  प्रकाश व लता अढळकर, धरणगाव पुरस्कृत भास्कर आडळकर सन्मानार्थ पुरस्कार – भारत रंगनाथ पवार (जिजामाता कन्या विद्यालय, देवळा, नाशिक), भूषण कोल्हे, पुणे पुरस्कृत एल. झेड. कोल्हे सन्मानार्थ पुरस्कार – चतुर्भुज विनायक शिंदे (आदर्श हायस्कूल, आडगाव, नंदुरबार), नंदकुमार सपकाळे, मुंबई पुरस्कृत एन. डी. सपकाळे सन्मानार्थ पुरस्कार – अरविंद अधिकराव कोळी (न्यू इंग्लिश स्कूल, पेठ, सांगली), चित्रकार वसंत वानखेडे फाउंडेशन, मुंबई पुरस्कृत वसंत वानखेडे स्मृती पुरस्कार – राजन कुसुम हिरालाल पवार (न्यू इंग्लिश स्कूल, साक्री)

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे