भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन
सिल्लोड (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी पुतळा परिसरात आयोजित रक्तदान शिबिरास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात सद्या रक्ताचा साठा कमी पडत असल्याने सामाजिक उपक्रमांअंतर्गत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त करीत वैदयकीय दृष्ट्या ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे त्यांनी रक्तदान करण्याचे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जि. प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेवक सुधाकर पाटील, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, जितू आरके, जुम्मा खा पठाण, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, माजी नगरसेवक संजय आरके यांच्यासह शेषराव आरके, राजेश्वर आरके, फहिम पठाण, राहुल काळे, ऍड. जी. एस. आरके, सुनीता आरके, राजू सपकाळ, बारकू आरके, आकाश आरके, शरद आरके, प्रदीप आरके, बी.के. दांडगे, मधुकर दांडगे, विजेंद्र काळे, किशोर जाधव, अतुल आरके, संदीप दांडगे, कैलास आरके, राहुल मोरे आदींची उपस्थिती होती.