कंठाची तहान भागवण्यासाठी पंधरा दिवसापासून उतरावे लागते विहिरीत
औरंगाबाद : शिवूर सुदामवाडी फिल्टर गावडीपी मागील सहा महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर झालेला असून वायर नेहमीप्रमाणे जळत असतात. वारंवार शेतकऱ्यांना डीपीवर त्रास सहन करावा लागतो. तसेच ट्रान्सफॉर्मरवर ज्यादा लोड झाल्या असल्याकारणाने अजून एक नवीन ट्रान्सफॉर्मर गरज आहे. तरी देखील इंजिनिअर वायरमेन कधी ठोकून देखील पाहत नाही. कर्मचारी उड उडीचे उत्तर देतात ऑफिसमध्ये कधी भेटत नाही शेतकऱ्यांचा फोन देखील उचलत नाही आतापर्यंत शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो
दिनांक 12 जून 2022 सदरील शेतकरी म्हणून मी महावितरण अधिकारी भेटण्यासाठी गेलो असताना सुट्टीवर असल्याचे कारणे व बहाणेबाजीचे उत्तरे दिले. मी एक शेतकरी व अशोक पाटील पवार सुदामवाडी येथील गाव डि पी व ट्रांसफार्मर जळालीचे माहिती देऊन सांगितल देखील कुठल्याही कर्मचाऱ्यांनी येऊन पाहिलं नसून उडऊडीचे उत्तर देतात. ट्रांसफार्मर आतापर्यंत डबल चार पट लोड झालेला आहे. तरी देखील कुठला इंजिनियर सर्वे करत नाही. त्या ठिकाणी नवीन डीपीची आवश्यकता आहे. तरी सर्वे करून ट्रान्सफॉर्मर गरज आहे. तरी देखील हलगर्जी करतात. तसेच या दि 22 जून 2022′ ट्रांसफार्मर खुलुन कन्नड येथील भरण्यासाठी नेला आहे. आज पुन्हा पंधरा दिवस उलटून गेले आहे तरी शेतकऱ्यांना अंधारात राहावा लागत असून एकीकडे वैजापूर तालुक्यामध्ये चोरांचा धुमाकूळ असून तात्काळ बिले भरण्याची सूचना देत आहे. सध्या शेतकरी हवालदिन झाला आहे. शेतकऱ्याकडे होते ते पैसे शेतीत टाकून शेती मध्ये पेरण्या केल्यात. पण आता निसर्गानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांनी जगावं कसं हा प्रश्न समोर आला आहे.
विहिरीतपाणी काढण्यासाठी खाली उतरून पाणी काढावे लागत आहे. जीव धोक्यात घालून हा सर्व त्रास सांहण करावा लागत आहे. महावितरण शिवूर वायर मन संतोष मोरे, इंजिनिअर रवी कुमार मोरे यांना प्रत्येक मी फोन द्वारे संपर्क साधून कळवले असताना देखील उड उडविचे उत्तर देत आहे. तात्काळ बिले भरावे असे सूचना दिले असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी सावकारांकडून कर्ज काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामध्ये लोक इंजिनिअरची हात मिळून आहे. त्यामुळे इंजिनियर उडवाउडवीचे उत्तर देत आहे. जनावरांना पाणी देखील नाही 80 ते 90 फुटावुण पाणी ओढावा किंवा विहिरीत उतरून मशीन चालू करून पाणी काढावी लागत आहे. जीव धोक्यात घालून पोटांची व जनावरांची तहान भागवण्यासाठी जीवाची कायापालट करावा लागत आहे. उद्या माझ्या जीवास विहिरीत उतरत असताना काही झाल्यास याला जबाबदार महावितरण राहील, असा इशारा अशोक पवार यांनी दिला आहे.