महाराष्ट्र
भाजप टीम मोदी सपोर्ट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी वैजीनाथ धेडे नेते
सोलापूर : भारतीय जनता पार्टी टीम मोदी सपोर्ट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी मोहोळ तालुक्यातील कातेवाडी येथील वैजीनाथ औदुंबर धेडे यांची निवड करण्यात आली आहे. यासमंधीचे निवडचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष बुढराज गेहलोत यांनी प्रदान केले.
मूलभूत हक्काकरिता व त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार विरुद्ध निस्वार्थपणे कार्यात राहून बीजेपीच्या वरिष्ठांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रमाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांची बांधणी करून जिल्हाभरात भाजपच्या शाखा उघडणार असल्याचे वैजीनाथ धेडे यांनी सांगितले. निवडीबद्दल वैजीनाथ धेडे यांचें भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसह कातेवाडी येथील ग्रामस्थांनी अभिवादन केले.