गंगापुरी आश्रम शाळा मध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन.
दिनांक: ४ आँगस्ट २०२२ जामनेर-प्रतिनीधी
जामनेर तालुक्यातील गंगापुरी स्थित आदीवासी आश्रम शाळेत दि.१ आँगस्ट रोजी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांचे अभिवादन करण्यात आले.
या वेळी आश्रम शाळेतील मुख्यध्यापक कक्षात लोकमान्य टिळक व अन्नाभाऊ साठे यांची प्रतिमेस मुख्यध्यापक एम.जी. तायडे यांनी पुष्पहार अर्पण व पूजन करुन अभिवादन केले. तसेच आश्रमशाळेतील इतर शिक्षक गण व विद्यार्थींनेही पूजन करुन अभिवादन केले.
मुख्याध्यापक एम.जी. तायडे यांनी लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्यनिष्ठा, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यप्रेम यावर माहिती दिली.तसेच महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे स्मरण करून कार्याचे अनुकरण आपल्याही जीवनात करावे असे त्यांनी वक्तव्य प्रकट केले. या वेळी प्रा.शि. प्रकाश पाटील, संजय भंगाळे, प्रेमलता यादव, एस.सी. गांगुर्डे, शिपाई व्ही. के. राने आदी उपस्थित होते.