वैजापूर नवनिर्वाचित बी डी ओ बोईनर यांनी माळी सागज येथे घेतला अपूर्ण कामाचा आढावा.
दिनांक : ४ आँगस्ट २०२२
वैजापुर:प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ
वैजापूर तालुक्यातील नवीन पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी बोईनर यांनी अपूर्ण घरकुल पूर्ण करण्यासाठी माळी सागज यथे ग्रामपंचायत मध्ये बैठक घेऊन घरकुल लाभार्थ्यांना कामे पूर्ण करण्याचे दिले आदेश प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक वर्षांपूर्वी ज्या लाभार्थ्यांना १५ हजार रुपये चा हप्ता मिळाला असून तरीही त्यांचे कामे पूर्ण होत नाही याचा अर्थ कि त्या लाभार्थ्यांना घरी आहे असे समजून ते रद्द करण्यात येतील असेही सांगितले व लाभार्थ्यांना विचारपूस केली असता त्यांनी शेती कामे असल्यामुळे घरांचे कामे पेंडिंग पडले असे सांगितले.
बोईनर म्हणालेत की ०१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट प्रधानमंत्री आवास योजना किंवा रमाई आवास योजना घरकुल वैजापूर तालुक्यातील एक हजार घरकुले कम्प्लीट झाले पाहिजे. असा एस.ओ.साहेबांचा आदेश आहे अन्यथा हे घरकुले रद्द करण्यात येईल. तसेच बैठक चालू असताना काही वयोवृद्ध नागरिकांनी बोईनर यांना विचारणा केली की माझं पूर्ण आयुष्य गेले तरीही मला घरकुल मिळेल नाही मला घरकुल मिळाले पाहिजे असे बोईनर यांच्याकडे मागणी केली तसेच पंचायत समिती विभागाचे संगे असलेले अधिकारी अमय पवार रॉयल धुळे विस्तार अधिकारी तसेच प्रमोद बेंगाळ घरकुल इंजिनियर यांना आदेश देत सांगितले की सर्व नागरिकांची अडवणूक होता कामा नये यांचे कामे लवकरात लवकर मार्गी लावावे व शासनाचा थोडेसे मायबाप या योजनेचे मार्गदर्शन करत गावातील वय वृद्ध नागरिकांना शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात तिथे असलेले युवा तरुणांना म्हतारपणी आई-वडिलांना जीव लावावे असे सांगत वय वृद्धांचा सत्कारही केला उपस्थितीत समस्त ग्रामपंचायत तसेच समस्त माळी सागज गावकरी होते.