महाराष्ट्र

शिंदखेडा शहरातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम ; पत्रकार परिषदेत विरोधकांचा आरोप

शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा शहरासाठी मंजूर झालेल्या २१ कोटी पाणीपुरवठा योजनेतील काम दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असतांना सुमारे ५ वर्षे होऊन देखील कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली नसून अजूनही शिंदखेडा शहरातील नागरिकांना आठ दिवसाआड नळाला येत असून सदर पाणीपुरवठा योजनेचे कम अत्यंत नित्कृष्ठ झाले असल्याचा आरोप शिंदखेडा नगर पंचायतीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष दिपक देसले व नगर पंचायतीचे विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

शिंदखेडा शहराला २१ कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजन मंजूर होऊन पाच वर्षे झाली असून सदर काम दीड वर्षात पूर्ण होणे आवश्यक असतांना अद्याप पावेतो सदर काम पूर्ण झालेले नसून सदर कामात मोठ्या प्रमाणावर भाजपाचे गटनेते अनिल वानखेडे यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत याबाबतीत वेळोवेळी नगरपंचायती चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगत याबाबत नगरविकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देऊन सदर कामाची चौकशी करण्याबाबत मागणी केली होती व त्यांनी सदर कामाची चौकशी करण्याचे आदेश देऊन देखील आजपावेतो कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देऊन त्यांनी देखील चौकशी करणेबाबत शिंदखेडा नगर पंचायतीला आदेशित केले असतांना त्याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

सदर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेला घरगुती नळ जोडणीत कुठलाही तांत्रिक पद्धतीचा वापर न करता अतांत्रिक पद्धतीने नळ जोडणी करण्यात आली आहे. सदर निवेदेनुसार एच डी पी पाईप वापरणे आवश्यक असतांना पीव्हीसी पाईप वर नळ जोडणी करण्याचा आरोप करीत पुढे सांगितले की,सदर नळ जोडणी करताना लोखंडी सलाई च्या साह्याने छिद्रे पडून नळ जोडणी देण्यात आल्याचा आरोप करीत सन २०१९ मध्ये निघालेल्या निविदेत रस्ता क्रॉसिंग साठी नळ जोडणीचे ३९६१ घेण्यात आले तर रस्ता क्रॉसिंग शिवाय घरगुती नळ जोडणीसाठी ३२९८ रुपये वसूल करण्यात आले. सदर योजनेत ७५० नळ जोडणी करण्यात आल्या. तर सन २०२२ मध्ये काढण्यात आलेल्या निविदेत सदर नळ जोडणीसाठी रस्ता क्रॉसिंग सह नळ जोडणीसाठी ३४५२ रुपये प्रमाणे घेण्यात आले. तर रस्ता क्रॉसिंग शिवाय २५०१ रुपये घेण्यात आले वास्तविक पाहता सन २०२२ मध्ये वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतांना नळ जोडणीचे दर कमी होतात व सन २०१९ मध्ये दर कमी असतांना नळ जोडणीचे दर वाढतात यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून येत असून सदर जोडलेले नळ जोडणी ची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत सदर कामाची चौकशी टाटा कन्सल्टन सर्विस यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे केली असून शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा व शहराला पन्नास वर्षे सदर योजना चालावी यासाठी यात कुठलेही राजकरण न आणता शहरातील जनतेचा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत यात कुठलीही दखल न घेतल्यास उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी सांगितले हे सांगत असतांना तालुक्यातील दोंडाईचा शहराला देखील २१ कोटी ची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे

सदर योजनेस शिंदखेडा नंतर मंजुरी मिळाली आहे .तेथील पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून तेथील सर्व कामे हे निविदे प्रमाणे होत असतांना शिंदखेडा शहरातील पाणीपुरवठा योजना नित्कृष्ठ पद्धतीने का होत आहे असा सवाल करीत शिंदखेडा व दोंडाईचा येथील कामाचे ठेकेदार एकच असतांना देखील दोन्ही ठिकाणच्या कामांमध्ये तफावत का ? असा सवाल व्यक्त करीत त्याबाबत चा फोटो यावेळी पत्रकार परिषदेत दाखविला सदर कामाची चौकशी आमचे समोर करून नित्कृष्ठ झालेल्या कामाबाबत चौकशी होऊन नित्कृष्ठ काम करण्याऱ्या व जबाबदार अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दोंडाईचा व शिंदखेडा ‌येथील पाणीपुरवठा योजना सारखीच असुन दोंडाईचा येथील सदर काम चांगले झाले असून शिंदखेडा येथील काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. याकडे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी लक्ष घातले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नगरसेवक उदय देसले, अशोक बोरसे, दिनेश माळी, कैलास वाघ, समद शेख, किरण थोरात, सुभाष देसले, निमण पठाण उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे