जळगाव जिल्हा
गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन पुढच्या आठवडयात
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) जळगाव जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशान्वये, आज दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता गिरणा धरणातुन पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन २००० क्युसेसने सोडण्यात येणार होते. माञ काही तांञीक कारणास्तव या पाण्याचे आवर्तन पुढच्या आठवडयात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती हेमंत पाटील, उप विभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी आता कशी केली असता दिली.