राजकीय

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला…. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या भाषण सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले.

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना…. असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे.

हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे

काल विधानसभेत एकनाथ शिंदेंनी काल सर्व टीकांवर उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, आपल्याला कुठलीही राजकीय राजकीय पार्श्वभूमी नाही. आमच्या भूमिकेवर टीका करताना आम्हाला भाजीवाला म्हणाले, टपरीवाला म्हणून हिणवले, गाडीवाला म्हणाले, मात्र आम्ही आहोतच ना टपरीवाले. प्रामाणिकपणे व्यवसाय करणे चुकीचे आहे का ? भाजी विकणे चुकीचे आहे का? हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे आहे, भाजीवाल्याचे आहे, टपरीवाल्याचे आहे, रिक्षावाल्याचे आहे. हे सरकार आपले आहे असे प्रत्येकाला वाटेल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे