कोवळ्या मनातील संकल्पनांची उत्तुंग झेप – चित्रकला स्पर्धेत श्री आर्ट कला वर्ग ला ५ रोख पुरस्कार.
अमरावती: ०५ जुलै २०२२.
प्रत्येकाला आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं, स्वप्नांचा पाठलाग करतांना काहींच्या हाती यश तर काहींचा प्रयत्न सुरूच असतो. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या अंतरंगाचा विसर नित्याचे असतांना जेव्हा कोवळ्या मनातील संकल्पना सप्तरंगातून समोर येथे तेव्हा ती उत्तुंग झेप सर्वांना थक्क करणारी ठरते. असाच अनुभव दर्यापूर येथे पा पडलेल्या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून मिळाला. या स्पर्धेत अमरावती येथील सुप्रसिद्ध श्री आर्ट कला वर्गाच्या तब्बल पाच विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक मिळाले.
दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या वाढदिसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धा झाली स्पर्धेमध्ये श्री आर्ट कला वर्गाचे व चित्र जागृती कला वर्गाचे ५०विद्यार्थीनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कला वर्गाला ५रोख पुरस्कार प्राप्त झाले आहे व चित्रजागृती वर्गाला एक पुरस्कार प्राप्त झाले आहे असे १७०००/-रुपयाचे पुरस्कार मिळाले आहे. यामध्ये पायल खाडे, धनश्री राणे, शुभांगी जगताप, उत्कर्ष वानखडे, सक्षम नितीन टेकरवाडे, पूजा उमेश डाहाके यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती तर्फे आमदार बळवंत वानखडे यांना प्रा सारंग नागठाणे यांनी काढलेले डिझीटल पोटरेट देण्यात आले.
आमदार बळवंत वानखडे यांच्या वाढदिवसा निमित्त कौसल्या देवी चेरिटबल ट्रस्ट दर्यापुर व श्री दे. झा वाकपांजर वेलफेयर संस्था लेहेगाव यांच्या सयूंक्त विध्यमाने ज़िल्हा स्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना खऱ्या अर्थाने वाव मीळावा हा या मागचा सर्वात मोठा उद्देश होता. विशेष म्हणजे, ५०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.