नाशिकमहाराष्ट्र
झाडे लावणे व जगवणे ही काळाची गरज.
भगूर:दि.०८ जुलै २०२२( प्रतिनिधि-गहनिनाथ वाघ) भगूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची माहिती देत मुख्याध्यापक व समस्त शिक्षक वृंदावन यांनी शाळेसमोर केले वृक्ष रोपण, वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे. वृक्षारोपण केल्याने केवळ झाडांची संख्यां न वाढता वृक्षारोपणाचे बरेच फायदे आहेत. पर्यावर्णाला समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत आपली शाळा ही निसर्गरम्य झाली पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांच्या साह्याने समस्त शिक्षक वृंदावनाच्या साह्याने शाळेसमोर वृक्षारोपण केलेे.