महाराष्ट्र
शिंदखेडा येथील पिक संरक्षण सहकारी सोसायटीत जयंती साजरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील पिक संरक्षण सहकारी सोसायटी कार्यालयात आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी चेअरमन विजय नाना चौधरी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी व्हाय चेअरमन योगेश देसले, संचालक अरुण देसले, दिलीप पाटील, बन्सीलाल बोरसे, कैलास पाटील, दत्तात्रय देसले, अशोक परदेशी, गजानन भामरे, यादव मराठे, विलास मोरे, संचालिका मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे, स्विकृत संचालक सुरेश महाले, संजय बडगुजर सचिव मनोहर भामरे आदी उपस्थित होते.