शिंदखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवंदनासह विविध कार्यक्रम
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील तहसील कार्यालयाजवळील पुतळा जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बुद्धवंदना जयंती उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आली. त्यानंतर डफ वादयाने सिद्धार्थ नगर पासून काॅलनी परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
तेथे अभिवादन करून उत्सव समितीच्या अभिमन पाटोळे , अध्यक्ष राहुल पाटोळे , राहुल अहिरे, अजय पानपाटील, विजय मोरे, राहुल कढरे, सनी बोरसे यासह समाज बांधव आणि नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे, भिला पाटील, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, उदय देसले, अरुण देसले, अशोक बोरसे सह सर्व नगरसेवक तसेच आमदार जयकुमार रावल, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे सह विविध पदाधिकारी, पी.आय. सुनील भाबड, नाईक आबा भिल, पोलिस पठाण, प्रा.निरंजन वेंदे, न्हानभाऊ पाटोळे, मिलिंद पाटोळे, शशीकांत बैसाणे, सुनील बैसाणे, अँड. अरविंद मंगासे, चंद्रकांत बैसाणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रथमच माजी सैनिक सैल्युट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संध्याकाळी जागेवर सवादय वादयाचा आस्वाद घेत बाबासाहेबांच्या गितावर मनमुराद आनंद लुटला. सदर कार्यक्रम साठी उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल पाटोळे, उपाध्यक्ष राहुल अहिरे, सचिव अजय पानपाटील, खजिनदार निलेश कापुरे, सल्लागार विजय मोरे, राहुल कढरे, सनी बोरसे, रोहित पाटोळे, बाळा नगराळे, प्रविण बैसाणे, प्रशांत पाटोळे,सागर बोरसे, अक्षय पाटोळे, गणेश पाटोळे, फहीम कुरेशी, राजु आखाडे, संदिप पाटोळे, यजाज कुरेशी, साजिद कुरेशी, बन्टी बोरसे, हेमंत पाटोळे आदि सदस्यांनी परिश्रम घेतले.