महाराष्ट्र

शिंदखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

शिंदखेडा (यादवराव सावंत) परसामळ येथील आर्यन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अँड. अरविंदकुमार मंगासे यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानक जवळ करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे यांनी केले. यावेळी गटनेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील, पोलिस निरीक्षक सुनील भाबड , माजी जि.प.सदस्य जयसिंग गिरासे, परसामळ सरपंच नारायणसिंग गिरासे , गिरीश टाटिया, आ.के.पवार, प्रा.निरंजन वेंदे, अँड.चंद्रकांत बैसाणे, अँड. गोपाल आखाडे , मिलिंद पाटोळे, राहुल पाटोळे, अजय पानपाटील, विजय मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी तीस रक्तदात्यानी रक्तदान केले. शिबीरासाठी तालुकाध्यक्ष प्रविण मंगासे, अशोक बैसाणे, राहुल गव्हाणे, नितीन पाटील, राहुल मराठे, हर्षदीप वेंदे, हुसेन शेख, राकेश परदेशी, चंद्रशेखर नगराळे, किरण तायडे, अजय साळुंखे,सागर भदाणे, नवनीत नरभवर, लालसिंग गिरासे, रावसाहेब बैसाणे, यांनी परिश्रम घेतले. धुळे येथील नवजीवन ब्लड ग्रुप चे डाॅ. सुनील चौधरी, टेक्नीसियनचे दिलीप जाधव, संजय थनगव्हाळ, गजानन चौधरी, सोनु सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे