दोंडाईचा शहर वंजारी समाज अध्यक्ष पदी हरेश आव्हाड यांची बिनविरोध निवड..
दोंडाईचा:१३ जुलै २०२२ प्रतिनिधि:प्रदीप गोसावी
दोंडाईचा येथील समाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून समाजाच्या प्रत्येक सुख-दुखात मदतीस धावणारे शंभो ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरेश आव्हाड यांची सर्वानुमते वंजारी समाजाच्या अध्यक्ष पदी निवड झाली असून उपाध्यक्ष पदी राहूल आव्हाड व सचिव पदी अभिषेक नागरे यांची निवड झाली आहे.
काल वंजारी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव निवड करण्यात आली. त्यादरम्यान नेहमी राजकीय सामाजिक जिवनातून वेळ काढत समाजहिताचे काम करण्यास प्राधान्य देत असल्याने सर्वानुमते अध्यक्ष पदाची धुरा हरेश अव्हाड यांच्यावर सोपविण्यात आली असून तर उपाध्यक्ष पदी राहूल आव्हाड व सचिव पदी अभिषेक नागरे यांची नावाची घोषणा केली.
हरेश अव्हाड यांच्या निवडीचे माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, उद्योपती सरकार साहेब रावल, मा. नगराध्यक्षा नयनकुवर रावल, वंजारी समाजाचे माजी अध्यक्ष गोविंद कागणे, माजी उपनगराध्यक्ष प्रदिप कागणे, डॉ. संतोष अव्हाड, बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत नागरे, पांडुरंग कागणे, महेंद्र गीते, दिपक नागरे, शैलेश नागरे, दिलीप नागरे, संजू आव्हाड, बापू नागरे, छोटू सांगळे, संतोष उगलमुगले, अजय सानप, बापू भाबड, मुरलीधर वंजारी, विलास कागणे, नितिन आव्हाड, मुकेश कागणे, संदीप काकडे, रविंद्र काकडे गणेश चकणे, कुणाल कागणे, सौरभ आव्हाड, मानव कागणे यांच्यासह आदींनी या निवडीचे अभिनंदन करत भावी कामास अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या जात आहेत.