ब्रेकिंग

आदिवासी स्त्रियांना प्रकल्प सक्षम अंतर्गत दुसऱ्या महिन्यातील सॅनिटरी पॅड वाटप

के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि खुशीयांन फाऊंडेशनचा उपक्रम

धुळे : जिल्हा विशेष प्रतिनिधी

धुळे : आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते. याबाबत महिलांना सॅनिटरी पॅड वापराबाबत सक्षम करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प “सक्षम” अंतर्गत खुशीयांन फाऊंडेशनच्या साहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सॅनिटरी पॅड वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा हा दुसरा महिना होता, या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले, तसेच हे पॅड पुनःवापरता येण्यायोग्य आहेत.
तसेच प्रकल्प “सक्षम” च्या माध्यमातून मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दिव्या सावळे यांनी समुपदेशन केले. या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर आणि सहसचिव चेतन उपाध्याय हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नियोजन के.वाय.के.एम च्या स्वयंसेविका ज्ञानेश्वरी बिडवे, भाग्यश्री भावसार, प्रियंका विसपुते, गौतमी कुलकर्णी, अविनाश पाटील, गणेश शेजुळ यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे