ब्रेकिंग
दुभाजकावर कार आदळून तीन जख्मी.
भुसावळ:दि-१४ जुलै २०२२
(अखिलेशकुमार धिमान)
भुसावळ तापीपुलाकडुन येणारी कार क्रमांक एम एच१९ बी यू ५६७५ काल दि. १३ रोजी सांयकाळी ७:४५ वा.गांधी पुतळ्या कडे येत असतांना समोरुन येणारी गाडी चे फोकस लाईट मुळे चालक संभ्रमित होऊन कार दुभाजकावर आदळली. अपघाता मुळे चालकाकडील टायर फुटले. कार मधील तीन जण जख्मी झाले त्या वेळी तेथून माजी नगरसेवक पिंटु कोठारी हे जात होते. त्यानी लगेच कार मधील जख्मींना खजगी रुग्णलयात दाखल केले.नंतर त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.जख्मी हे जळगांव पिंप्राळा येथील निवासी आसुन रणजित पाटील,भावेश पाटील व इतर एक व्यक्ति असे आहे. अपघाती स्थानी शहर पोलिसांनी धावघेत मदत केली.