चोपडा

नौसेनेतर्फे परेडसाठी प्रशिक्षक म्हणून राहुल पाटील यांची निवड

चोपडा (विश्वास वाडे) भारतीय नौदलात कार्यरत मजरेहोळ येथील राहुल रणछोड पाटील यांची नौसेनेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडसाठी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. मागील ११ वर्षापासून नौदलामध्ये राहुल पाटील कार्यरत असून सद्ध्या कर्नाटक या ठिकाणी सेवा देत आहेत.


भारतीय महासागरामध्ये सुरक्षा व संतुलन राखण्याचे कार्य नौदल सैनिक म्हणून ते करीत आहेत. त्यांनी ड्रिल इंस्ट्रक्टर चा कोर्स केला असून नौदलातील सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य ते करतात. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नौदलातील एकूण ९६ सैनिक परेड करण्यासाठी आले होते ,त्यांच्या प्रशिक्षणासाठी एकूण ७ प्रशिक्षकांची निवड करण्यात आली. एक प्रशिक्षक म्हणून राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांनी २६ जानेवारीला राष्ट्रपतीं समोर परेड सादर केली. मागील दोन महिन्यांपासून ते नौसैनिकांना परेडसाठी दिल्ली येथे प्रशिक्षण देत होते. मजरेहोळ येथील सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन ग्रामीण भागातील या युवा सैनिकाने नौदलात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तसेच आपल्या चोपड्या साठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे सर्वस्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे