बोरसर येथे ३२२ शेतकऱ्यांना भागवत कराड यांच्या हस्ते मोफत बियाणे वाटप
वैजापूर (अशोक पवार) खंडाळा सर्कल, बोरसर गण समाविष्ट गावे सुदामवाडी, रघुनाथपूरवाडी, बोरसर येथे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 322 शेतकऱ्यांपैकी प्रति शेतकऱ्यांना 2 मका 1 कपाशी 1 बाजरी पिशवी बोरसर येथे ग्रीनग्लोब फाउंडेशन संभाजीनगर यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन कराड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बोरसर गणात सुदामवाडी, रघुनाथपूरवाडी, बोरसर या ठिकाणी विष्णू मंदिर मध्ये मोफत बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव तालुका अध्यक्ष कल्याण दागोडे, जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष कैलास पाटील पवार, तालुका अध्यक्ष अनिल वाणी त्यांच्या सर्वांच्या नेतृत्वात अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप ऑनलाईन नोंदणी करून घेण्यासाठी अशोक पवार, सोमनाथ पवार, ज्ञानेश्वर पवार यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ऑनलाइन केले.
त्यामुळे मोफत बियाणे मिळाले व गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उत्सवाचे वातावरण होते. प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, उद्योग आघाडी जिल्हा आध्यक्ष कैलास पाटील पवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल वाण, अशोक शेळके, किसन क्रांति संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर साळुंके, किसान आघाडी तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील पवार, बुथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सोमनाथ पवार, दादा कानडे, नाना मतसागर, दादासाहेब गोल्हार, दादासाहेब कानाडे, जनार्दन जाधव, अशोक शेळके, संदीप कोल्हे, जगदीश पवार व आदी मान्यवर, गावातील नागरिक उपस्थित होते.