आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
स्व.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल मालपुर येथे सर्व नविन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
मालपुर : मालपुर ता.शिंदखेडा जि.धुळे येथे स्वध्दारक विद्यार्थी संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कूल येथे पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला.
यात तुरवड दाळ, खिचडी, गोड स्वीटमध्ये जलेबी देण्यात आले व ५ वी ते ८ वी पहिल्या दिवशी शालेय पुस्तक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. वसईकर, पर्यवेक्षक आर.बी.सुर्यवंशी व ग्रंथपाल प्रमोद गिरासे व शिक्षक व कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य व पालक उपस्थित होते.



