शिंदखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सोहळा
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलवर मतदारांनी जो विश्वास दाखवला त्या बद्दल मतदार राजाचे आभार मानत. निवडलेल्या व पराभूत अशा सर्वांचे सत्कार समारंभ करण्यात आला.
निवडलेले उमेदवार १) पाटील दिलीप आधार. २) पाटील प्रकाश नथु. ३) पाटील मनीष कालीदास. ४) देसले सचिन चंद्रकांत या निवडलेल्या सर्वानी मतदारांचे आभार मानले. यावेळी उपस्थित भाऊसाहेब प्रा. सुरेश देसले, सभापती पं.स. शिंदखेडा, सुनील चौधरी विरोधी पक्ष नेता न.पं. शिंदखेडा, दीपक सुधाकर देसले मा. प्र.नगराध्यक्ष व शेतकरी विकास पॅनल चे पॅनल प्रमुख यांच्यासह विनायक पवार, दिनेश माळी, उदय देसले,सतीश आण्णा भामरे, कैलास भामरे, कैलास माळी, समद शेख, भैय्या चौधरी, गजू भामरे, वेडू माळी, श्रीराम चौधरी, नाना चौधरी, राजधर कसबे, हिरालाल भोई, प्रकाश पाटील, निमन दादा पठाण, शाकीर कुरेशी, पवन देसले, गोलू देसले, मनोज माळी, भूषण मराठे, राजू शिरसाठ, बाबा देसले, पंकज देसले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.