शिंदखेडा येथील स्वामी समर्थ संस्था चेअरमन डॉ.आर.आर. पाटील यांना उत्कृष्ट संस्थाचालक पुणे येथे सन्मानित
शिंदखेडा (यादवराव सावंत) लोकमत पुणे आयोजित महाराष्ट्रातील अलौकिक परंपरा जपणारे शिक्षण संस्था सोबत परिसंवाद व पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदखेडा येथील स्वामी समर्थ संस्था चेअरमन डॉ.आर.आर.पाटील यांचा उत्कृष्ट संस्थाचालक म्हणुन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा शालेय शिक्षण कामगार महिला बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री नामदार बच्चु कडु यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शिंदखेडा येथील शहरातील नव्हे तर परिसरात नावारुपाला आलेल्या भव्य दिव्य इमारत व शिक्षणाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न शिल असणारी एकमेव संस्था उदयास आली आहे.दहावी बारावी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. संगणक आणि दर्जेदार शिक्षण व्हावे गोरगरीब विद्यार्थ्यांना वसतीगृहात मोफत प्रवेश देऊन दर्जा मिळवून दिलेली संस्था होय.हयासाठी संस्थाचालक म्हणुन डॉ.आर.आर.पाटील यांनी सातत्य ठेवले आहे. म्हणुन नुकताच संपन्न झालेल्या पुणे येथे लोकमत समूहाच्या वतीने काॅनराॅड हाँटेलमध्ये शानदार सोहळ्यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील स्वामी समर्थ संस्था चेअरमन डॉ.आर.आर.पाटील यांचा उत्कृष्ट संस्थाचालक म्हणुन सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा शालेय शिक्षण कामगार महिला बालकल्याण विमुक्त भटक्या जाती जमाती विभागाचे राज्यमंत्री नामदार बच्चु कडु यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ह्यावेळी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सुरज मांढरे, लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. शिंदखेडा शहरातील संस्था चालक म्हणून उत्कृष्ट योगदानाबद्दल एक मानाचा तुरा डॉ.आर.आर.पाटील यांच्या रूपाने रोवला गेला आहे म्हणून त्यांचे सर्वच स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.