जळगाव जिल्हामहाराष्ट्र
विज बिल कमी न केल्यास आमरण उपोषणास बसण्याचा सुतार यांचा इशारा .
जळगांव: दि. १९ जुलै २०२२: (विशेष प्रतिनिधि):
वाढीव विज बिल येत असल्याची तक्रार विज वितरण च्या अधिकारी यांच्याकडे दोन महिन्या पासून केल्यानंतर ही मधुकर सुतार यांना न्याय मिळालेला नाही दोन दिवसात न्याय न मिळाल्यास विज वितरण कार्यलाया समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सुतार यांनी दिला आहे.
हरिविठ्ठल नगरातील भामरे टेन्ट हाऊस जवळील रहिवाशी मधुकर शंकर सुतार यांनी महावितरण यांना तक्रारी अर्ज दोन महिन्यापासून अर्ज केला असून त्यांना एक महिन्याचे वीज बिल दोन ते तीन हजार रुपये येत असून त्यांनी वीज बिल कमी येण्या साठी अर्ज केला अजून आज पर्यंत त्यांवर वरिष्ठ अधिकारी यांनी काही कारवाई केली नाही त्यांना न्याय मिळवण्यासाठी दैनिक खान्देश विश्ववेध यांच्याशी संपर्क साधुन न्याय मिळावा याची मागणी केली.



