जळगाव जिल्हाधरणगावमहाराष्ट्र
धरणगावजवळील डॉ.हेडगेवारनगर वस्तीला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा.
दिनांक – १९ जुलै २०२२
विशेष प्रतिनिधि जळगांव : जिल्ह्यातील धरणगाव शहराजवळील डॉ. हेडगेवारनगर या वाढीव वस्तीला आता स्वतंत्र महसुलीc गावाचा दर्जा प्रदान करणारी अधिसूचना राज्यपालांच्या आदेशान्वये शासनातर्फे सोमवार, 18 रोजी जारी करण्यात आली. त्यानुसार आता येथे ग्रामपंचायत अस्तित्वात येईल. धरणगाव शहराजवळील वाढीव वस्तीतील डॉ. हेडगेवारनगर वस्तीला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. याबाबतचा ठराव जि.प.स्थायी समितीतही मंजूर झाला होता.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने यासंबंधीची अधिसूचना 18 जुुलै 2022 रोजी काढली आहे. या अधिसूचनेवर शासनाचे उपसचिव पी. डी. देशमुख यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी पाठपुरावा केला होता.