जळगावात पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी, कायदा चे रक्षण करणारा कायदा तोडायला लागला ?

दिनांक :- ३० आँगस्ट २०२२
जळगांव :- जिल्हा विशेषप्रतिनिधी
जळगाव शहरातील डी मार्ट परिसरात आपल्या खाजगी चार चाकी वाहणाला साईड दिली नाही म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने त्या वाहनाला थांबवून क्लिनर व गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला मारहाण केली.या दरम्यान रस्त्यावर ट्राफिक ही जाम झाली. यावेळी हा सर्व प्रकार उपस्थित लोक बघत होते. खरेतर साईड ड्राइव्हर ने दिली नाही मग मारहान क्लिनर व पॅसेंजर ला का ? असा प्रश्न उपस्थितानमध्ये निर्माण झाला होता. पण ईच्छदेवी ते डिमार्ट ह्या रस्त्यावर साधे चालता येत नाही तर तो वाहन चालक ह्या पोलिस अधिकाऱ्याला साईड कशी देणार ? असा प्रश्न ह्या वेळी निर्माण होतो, जर वाहन चालक चुकलाच असेल तर पोलीस अधिकाऱ्यांने त्या वाहनचालकाला संबंधित पोलीस स्टेशन ला न्यायला हवे होते.असा सवाल उपस्थित नागरिकांमध्ये निर्माण झाला होता.
आमच्या प्रतिनिधी नी हे पोलीस अधिकारी कोण ह्याचा शोध घेतला असता ते जळगाव शहर पोलीस स्टेशन ला सहाय्यक पोलीस निरीक्षक (परदेशी) असल्याचे समजले. जर सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे दुसऱ्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत कायदा हातात घेऊन मारहाण करीत असतील तर वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी ह्याच्यावर कार्यवाही करणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.?