किसान महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा जयश्री खैरनार यांचा सत्कार
आर्वी (करण ठाकरे) धुळे जिल्हा किसान काँग्रेस महिला अघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी जयश्री खैरनार यांच्या नियुक्तीबद्दल धुळे तालुका काँग्रेसच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
दुसाणे ता.साक्री येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या जयश्री खैरनार यांची नुकतीच काँग्रेसच्या किसान सेल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे काँग्रेस पक्षाकडून सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. दुसाणेसारख्या ग्रामीण भागाशी आणि मुख्यतः शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या महिला पदाधिकार्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने शेतीक्षेत्रात असलेल्या महिलांचे संघटनसाठी पक्षाला फायद होणार आहे. दरम्यान धुळे तालुका काँग्रेस पदाधिकार्यांच्यावतीने नुकताच आ.कुणाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, माजी जि. प. सदस्य साहेबराव खैरनार, अवजड वाहतूक काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, नंदुभाऊ खैरनार, पप्पु भदाणे, पं. स. सदस्य भाऊसाहेब पाटील, शिवाजी अहिरे, किरण नगराळे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष बानुबाई शिरसाठ आदी उपस्थित होते.