महाराष्ट्र
सुशिलाबाई देशमुख यांचे निधन ; शुक्रवारी अंत्ययात्रा
शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका सुशिलाबाई यशवंतराव देशमुख (वय ८९) यांचे आज १० फेब्रुवारीला सकाळी साडेआठला अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पांबामा म्युनिसिपल हायस्कुल जवळील राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कै. सुशिलाबाई देशमुख यांनी शिरपूर तालुका खरेदी विक्री संघ, शिरपूर विविध कार्यकारी सोसायटी या संस्थांच्या चेअरमन व संचालक म्हणून काम पाहिले होते.