मांडळ येथे दिक्षार्थी बहिणीचे वरघोडा मिरवणूक व सत्कार समारंभाचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात मांडळ हे सर्वात मोठे गाव असून गावात जैन धर्मीय बांधवांची मोठया प्रमाणात संख्या आहे, मांडळ येथील स्थानकवासी जैन समाजामध्ये या अगोदरच चार बहिणींची दीक्षा संपन्न झाली. तसेच दिगंबर जैन समाजामध्ये दोन बहिणींची दीक्षा संपन्न झाली आहे.
तसेच यावेळी गावातील महेश कुमार मोहनलाल बेदमुथा (जैन) यांच्या सुकन्या कुमारी अक्षिता हीसुद्धा समरथ गच्छाधिपति गुरुदेव 1008 परमपूज्य श्री उत्तमचंदजी म. सा. यांच्या सुशिष्या 1005 प पू श्री विमलकवरजी म.सा. यांच्या सान्निध्यात व समूहात दीक्षा ग्रहण करणार आहे,कुमारी अक्षिता महेश कुमार बेदमुथा,आई सौ अरूणाबाई महेश जी बेदमुथा वय 20 वर्ष तसेच शिरपूर येथील नवनीत कुमार विजय चोरडिया, आई सुजाता नवनीत चोरडिया यांची सुकन्या कुमारी सभ्यता नवनीत चोरडिया वय 17 वर्ष या दोन्ही दिक्षार्थी बहिणी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात दीक्षा ग्रहण करणार आहेत. तसेच दोन्ही बहिणी दिक्षार्थी व त्यांच्या परिवारांचा सत्कार समारंभ व गावातून मिरवणूक व रथामधून वरघोडा श्री वर्धमान स्थानकवासी जैन समाजातर्फे दि 11 फेब्रुवारी रोजी मांडळ येथे करण्यात आला आहे.
मांडळ हे गाव महाराष्ट्रात जैन समाजामध्ये दीक्षा नगरी म्हणून ओळखण्यात येते, या दोन्ही बहिणी दीक्षा ग्रहण केल्यानंतर आजीवन अनवाणी पायाने भारतभर भ्रमण करतील पैसा, चप्पल, विजेचा वापर, कांदे, बटाटे, लसूण, अद्रक, कंदमुळे यांचे आजीवन त्याग करणार आहेत संसार सोडून ते वैराग्य घेणार आहेत तरी मांडळ जैन श्रावकमांडळ संघातर्फे व ग्रामपंचायत सरपंच सर्व ग्रामपंचायत कमिटीतर्फे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे