तबला वादनातील बारकावे व तंत्र ” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा – विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे हा कार्यशाळा घेण्यामागचा हेतू.
दिनांक – २४ जुलै २०२२ जळगांव-प्रतिनिधि
जळगांव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय येथील कान्ह ललित कला केंद्राच्या ‘स्वरदा संगीत विभाग ‘आयोजित दि.२३ व २४ जुलै या दरम्यान “तबला वादनातील बारकावे व तंत्र ” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे हा कार्यशाळा घेण्यामागचा हेतू आहे.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सुप्रसिद्ध पं.सुरेश तळवळकर यांचे जेष्ठ शिष्य यांची उपस्थिती
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील सुप्रसिद्ध पं.सुरेश तळवळकर यांचे जेष्ठ शिष्य पं.जयंत नाईक.( नाशिक )आणि पं.जयंत नाईक यांचे नाशिक येथील शिष्य व्यंकटेश तांबे हे उपस्थित आहेत.एकलव्य सभागृहात ही कार्यशाळा सुरू आहे.उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख पं. संजय पत्की यांनी केले. अध्यक्षस्थानी के.सी.ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर,प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे,फाईन आर्ट विभागाचे प्रमुख मिलन भामरे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत पं.श्री.नाईक यांचे शिष्य योगेश संदानशिव (अमळनेर ) आशिष राणे ( मुंबई ),सचिन जगताप (बडोदा ) देवेंद्र गुरव(जळगाव ) हे साथ संगत देत असून सहकार्य करीत आहेत.तर हार्मोनियम साथसंगत स्वरदा संगीत विभागाचे प्रा.कपिल शिंगाने हे देत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा देशपांडे यांनी केले.