अररर काय मास्तर तुम्ही पण ? लाच घ्या पण पिएचडी द्या, म्हणारा गुरुजी गजाआड !
धुळे (प्रतिनिधी) लवकर पीएचडीची पदवी मिळवून देण्यासाठी शोध निबंधासाठी मार्गदर्शक असलेल्या गुरुंना इच्छेविरुद्ध 50 हजारांची लाच देणारा प्राथमिक शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पीएचडीचे मार्गदर्शक असलेल्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तीन संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम सुरु आहे.तीन विद्यार्थी पैकी एक साक्री तालुक्यातील बसरावल येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक सुकेंद्र किसनराव वळवी यांचा समावेश आहे.सुकेंद्र वळवी यांनी पिएचडीसाठी 2015 मध्ये नोंद केली होती.
संशोधन पध्दतीनुसार अभ्यास करून शोध प्रबंधाचे लेखन करून सामाई प्रगती अहवाल मार्गदर्शक गुरुंच्या सहिने सादर करायचा असतो वळवी यांच्या सामाई प्रगती अहवालात मार्गदर्शक गुरुंना त्रुटी आढळल्या होत्या त्याबाबत शिक्षक सुकेंद्र वळवी यांना मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या मात्र वळवी यांनी लवकर पिएचडी मिळावी यासाठी मार्गदर्शक गुरुंना वेळोवेळी पैशांचे आमिष दाखविले. याबाबत इच्छेविरुद्ध लाच दिली जात असल्याची मार्गदर्शक गुरुंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाला तक्रार दिली होती.
त्या तक्रारीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी बालाजी हॉटेल येथे सापळा रचत 50 हजारांची लाच देतांना प्राथमिक शिक्षक सुरेंद्र वळवी यांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधिक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस अधिक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, शरद काटके, राजेन कदम, कृष्णाकांत वाडीले, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, गायत्री पाटील, संतोष पावरा, संदीप कदम, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी कारवाई केली आहे.