राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत लागली शहरातील दोन खेळाडूंची वर्णी
धुळे (करण ठाकरे) टी-२० क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ऑल इंडिया टी-२० क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा उत्तर प्रदेशातील आग्रा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी शहरातील दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी झेड. बी. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी कृष्णा बारकू लामखेडे व एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी मतीन अजमत खान यांची निवड करण्यात आली आहे. खेळाडूंनी आतापर्यंत विविध क्रिकेट स्पर्धेत चमक दाखविली आहे. कृष्णा आणि मतीन दोघांना उत्तर महाराष्ट्र टी २० क्रिकेट असोसिएशनचे समन्वयक शेख मोहसीन सलीम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबद्दल आमदार कुणाल पाटील, प्राचार्य एम. व्ही. पाटील, उपप्राचार्य के. एम. बोरसे, क्रीडा शिक्षक आर. के. पाटील, सुधाकर पाटील, टीम मॅनेजर रितेश जगदाडे, अजमत खान, प्राचार्य पी. एच. पवार, मंगला पाटील, क्रीडा शिक्षक प्रभाकर चौधरी, टीम मॅनेजर रितेश जगदाळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.