महाराष्ट्रराजकीय

देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा ; बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

बुलडाणा (करण झनके) माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपशब्द बोलल्या बद्दल बहुजण मुक्ती पार्टीच्या वतीने आज बुधवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजरत टिपू सुलतान यांच्या विषयी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अवमान जनक उल्लेखाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी विशाल वाकोडे यांनी केले.

यावेळी त्यांनी सांगितले की १५६ मंदिरांना हजरत टिपू सुलतान यांनी मदत केल्याचा इतिहासात पुरावा आहे. शृंगेरी च्या मठावर पटवर्धन पेशव्यानी जेव्हा हल्ला केला तेव्हा त्या मठाला वाचवण्यासाठी टिपू सुलतान यांनी मदत केली. बहुजन स्त्रियांना दक्षिणेत कमरेच्या वर कपड़े घालण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार मिळवून देणारे सर्व प्रथम राजे टिपू सुलतान आहेत. एवढा सगळा इतिहास असताना त्यांना हिंदू विरोधी संबोधने केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम आहे. त्यामुळे प्रशासनाने जागृत होऊन त्वरित फडणवीसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी बहुजन मुक्ती पार्टी बुलडाणा च्या वतीने करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे