गुन्हेगारीमहाराष्ट्र

बोडवडच्या तरुणाचा जामनेर येथील कांग नदीच्या पुलाखाली आढळला मृतदेह

बोडवड (प्रतिनिधी) जामनेर येथील कांग नदीच्या पात्रात बोदवड रस्त्याच्या पुलाखाली बोदवड येथील तरुणाचा मृतदेह दुचाकीसह आढळुन आल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या तरुणाचा अपघात झाला की हत्या ? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून शुभम माळी (वय २५ रा. दत्त कॉलनी बोदवड) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह जामनेर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शुभम माळी हा वाहन चालक असून त्याचा मृतदेह आज जामनेर शहरातील कांग नदीच्या पात्रात बोदवड रस्त्यावरील पुलाखाली आढळून आला आहे. त्याच्या चेहऱ्यावर मार लागला असून जवळच त्याची एम. एच,19 डी. 2639 या क्रमांकाची दुचाकी देखील आढळून आली आहे. दरम्यान शुभम माळी याचा अपघात झाला की हत्या याचा जामनेर पोलीस शोध घेत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे