महाराष्ट्र

पाचोरा-जामनेर पीजे रेल्वे तत्काळ सुरु करा ; रेल्वे राज्यमंत्री व रेल्वे बोर्ड अध्यक्षकांकडे मागणी

मलकापूर (प्रतिनिधी) कोविड महामारी मुळे मागील २ वर्षापासून बंद असलेली पाचोरा-जामनेर पीजे रेल्वे तत्काळ सुरु करण्यात यावी तसेच सदर पीजी रेल्वेच्या रुंदीकरण व मलकापुर पर्यंत वाढविण्याच्या कामाचा डीपीआर तत्काळ मंजूर करणे बाबत खासदार उन्मेषदादा पाटील व पीजे रेल्वे बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळासह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील व रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनय कुमार त्रिपाठी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

ब्रिटीश काळापासून सुरु असलेली पाचोरा-जामनेर पीजे रेल्वे कोविड महामारी मुळे मागील २ वर्षापासून बंद आहे. तसेच सदर रेल्वे रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात येणार आहे अशी मागील बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. त्यामुळे सदर रेल्वे वर अवलंबून असलेले व्यापारी, नागरीक व शेतकरी चिंतेत होते. सदर रेल्वे बंद होऊ नये यासाठी पीजे रेल्वे बचाव कृती समिती मार्फत अनेक प्रयत्न सुरु होते. सदर नागरिकांची शंका दूर करण्यासाठी मी व उन्मेषदादा पाटील यांनी सदर शिष्टमंडळासह दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री व रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांची भेट घेऊन पीजे रेल्वे विषयी सविस्तर चर्चा केली.

यावेळी पीजे रेल्वेचे इंजिन नादुरुस्त असुन, लवकरात लवकर इंजिनची दुरुस्ती करून पीजे सुरु करण्यात येईल, तसेच अर्थसंकल्प २०२१ मध्ये पीजे रेल्वेचे मंजूर असलेले रूळ रुंदीकरण व मलकापुर पर्यंतच्या वाढचा डीपीआर मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून रेल्वे मंत्रालयास प्राप्त असुन सदर डीपीआर वर शिफारस लवकरात लवकर करणेबाबत यावेळी दोन्ही खासदारांना आश्वासन देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे