वैजापूर तालुक्यातील झोपडी मुक्त गाव मांडकी
दिनांक : २४ जुलै २०२४
वैजापुर प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ.
वैजापुर:सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभाग असायला हवा महाराष्ट्राने पंचायतराज संस्थेचे मुहूर्तमेढ रोल्याने आणि राज्याला गौरवशाली आहे त्रिस्तरीय पंचायतराज संस्थेच्या देशातील एक उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जाते त्रिस्तरीय संस्थेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा निधी ग्रामपंचायतइना दिला जातो या निधीचा योग्य वापर केल्यास गाव सुजलाम सुफलाम होते. आलेल्या निधी गावाचा विकास कामासाठी वापरला तर गावात कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही मांडकी गावामध्ये राहणारे सरपंच गावातील नागरिकांच्या समस्या जाणून गावाचा विकास करतात.
तसेच गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या शाळेचे व्यवस्थापन अंडरग्राउंड गटार सिमेंट रस्ते स्मारके वृक्षरोपण अशा प्रकारच्या सुविधा सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने गावाला मिळाल्यात गावातील गरीबातील गरीब नागरिकांना त्याचे स्वतःचे पक्के घरे असून एकही व्यक्ती झोपडीच्या घरात राहत नाही गावाला सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या वतीने सर्व सुविधा देण्यात आल्यात यामुळे आमचे गाव एक आदर्श गाव आहे असे गावकरी म्हणालेत.