धुळे जिल्हा न्यायालय नवीन जागा कुंपण भिंत बांधण्यासाठी व मोतीनाला पुल रुंदीकरणासाठी पुरवणी अर्थसंकल्पात निधी मंजूर
धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरातील मोगलाई भागातील मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. मोगलाई करांची अनेकवर्षांपासून मागणी होती कि, मोतीनाल्यावर असलेल्या पुलाची रुंदी वाढविण्यात यावी. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या सुटणार असून अशी गंभीर परिस्थिती बघून धुळे शहर आमदार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती.
मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोती नाला पुलाच्या रुंदीकरणासाठी पुरवणी अर्थ संकल्पात ३.८० कोटीचा निधी मंजुर केला आहे. तसेच धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन जागेला कुंपण भिंत वाढण्यासाठी १.७६ कोटीचा निधी पुरवणी अर्थ संकल्पात मंजूर केला आहे.
मोती नाला पूल रुंदीकरणामुळे साक्री रोड वरील वाहतुकीच्या समस्येचे निराकरण होणार आहे. त्यामुळे साक्री रोड व मोगलाई परीसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आ.फारूक शाह यांचे आभार मानले आहे.