कंडारी येथील गोलाणी परिसरात १८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.
दिनाक:२९ जुलै २०२२
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
भुसावळ-: भुसावळ ता.येथील कंडारी शिवारात गोलाणी परिसरातील रहिवासी १८ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.
या बाबत सविस्तार माहीती अशी कि,भुसावळ ता. येथील कंडारी शिवारात गोलाणी परिसरातील रहिवासी नंदू कोळी व कंडारी ग्राम पंचायत सदस्या शारदा कोळी यांची कन्या नावे निकीता नंदू कोळी (व.१८) हिने दि.२८ रोजी सकाळी ११:०० वाजे सुमारास घरात कोणी नसताना राहत्या घरी किचन मध्ये छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतली.
घटना समझताच़ घराचे लोकांनी पाहिले व तिला खाली उतरुन मानवतकर हॅास्पिटल येथे नेले, डाॅ राजेश मानवतकर यांनी तपासणी करुन तिला मृत घोषित केेले. घटनाची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक राहुल गायकवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि.सुदर्शन वाघमारे व प्रशांत लाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ट्राॅमाकेअर सेंटर येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
निकीता हिने महाविद्यालयीन दुसऱ्या वर्षाची परीक्षा दीली होती. तर तिच्या भावाचा काल वाढतिवस ही होता निकीता ने हे टोकाचे पाऊल का उचलले कारण सद्या अस्पष्ट असुन या प्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनात अकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे.