तब्बल दीड लाख बालकांनी घेतली पोलिओ लसीकरण : आजपासून घरोघरी
धुळे (करण ठाकरे) जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १ लाख ७८ हजार बालकांना रविवारी पोलिओ डोस देण्यात आला. ज्यांना डोस मिळाला नाही त्यांना आठ दिवसांत घरोघरी जाऊन डोस दिला जाणार आहे.
जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ९४४ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजे १ लाख ७८ हजार ८३६ बालकांना डोस देण्यात आला. लसीकरणासाठी जिल्ह्यात १ हजार ७६१ केंद्र होते. प्रत्यक्ष बूथवर डोस देणे, बालकांना बोलावून आणण्यासाठी ३ हजार ५२२ कर्मचारी कार्यरत होते. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक गावात पथक गेले. तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन, चेक पोस्ट या ठिकाणीही पथक होते. आहेत.
असे झाले दिवसभरात लसीकरण • जिल्ह्याचे पोलीओ लसीकरण पुर्ण होण्यासाठी धुळे, साक्री, शिंदखेडा शिरपूर व धुळे ग्रामीण तालुक्यात जबाबदारी सोपविण्यात आली होती. धुळे तालुक्यातून पाच वर्षाखालील लाभार्थी ४५ हजार ४०७ होते तर पाच वर्षावरील लाभार्थी ६८१ होते. साक्रीतालुक्यात पाच वर्षाखालील ४८ हजार ३७६, पाच वर्षावरील ५३०, शिंदखेडा पाच वर्षाखालील २६ हजार ९८९ तर पाच वर्षावरील ३०९, शिरपूर तालुक्यातील ४२ हजार ७२७ पाच वर्षाखालील तसेच ५२९ पाच वर्षावरील बालके आहेत. असे एकूण धुळे ग्रामीण पाच वर्षाखालील १ लाख ६३ हजार ४९९ तर बालक पाच वर्षाखालील आहेत. तसेच पाच वर्षावरील २०४६ यासह शहरी भागातील पाच वर्षाखालील १३ हजार २३० बालके आहेत. तर ६१ बालके पाच वर्षावरील आहेत. असे एकूण रविवारी दिवसभरात १ लाख ७८ हजार ८३७ तर पाच वर्षावरील १ लाख ७८ हजार ८३७ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे.



